हिवाळ्यात कर्नाळा किंवा राजस्थानातील भरतपूर येथील जंगलात पक्षीनिरीक्षणासाठी अनेक पर्यटक जातात, परंतु या दिवसांत कधी काळी मुंबईत सुमारे 350 प्रकारच्या जातीच्या पक्ष्यांचा वावर होता, असं कुणाला सांगितलं तर त्यांचा विश्वास बसणार नाही.
मुंबई- हिवाळ्यात कर्नाळा किंवा राजस्थानातील भरतपूर येथील जंगलात पक्षीनिरीक्षणासाठी अनेक
पर्यटक जातात, परंतु या दिवसांत कधी काळी मुंबईत सुमारे 350 प्रकारच्या जातीच्या पक्ष्यांचा वावर होता, असं कुणाला सांगितलं तर त्यांचा विश्वास बसणार नाही. युरोप, आफ्रिका, आशिया खंडातील अनेक स्थलांतरीत पक्षी मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, आरे कॉलनी, विक्रोळी पार्कसाइट, दादर हिंदू कॉलनी, आयआयटी पवई, मलबार हिल, रेसकोर्स, राणीबाग इत्यादी भागात सहज दिसत होते, परंतु वाढत्या शहरीकरणामुळे स्थलांतरीत पक्षी येण्याच्या प्रमाणात घट झाली आहे. इथल्या ‘ग्रीनपॅच’ संवर्धनाबरोबर आंबा, पिंपळ, उंबर, वड अशा झाडांची लागवड करून त्यांची जोपासना केली तर बोर्डीमैना (रोझिस्टार्लिग), वॉरब्लेर्स, स्टेफी इगल, ग्रेटर स्पोटेल इगल, पॅरोहॉक, फाल्कनसारखे युरोप आणि सैबेरियातील पक्षी मुंबापुरीच्या दिशेने कूच करतील, असा विश्वास पक्षीप्रेमींकडून व्यक्त केला जातो.मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि आरे कॉलनी हा परिसर बघितल्यानंतर पूर्वीची मुंबापुरी कशी होती, याची कल्पना येते. तेव्हा इथे स्थानिक पक्ष्यांबरोबर स्थलांतरीत पक्षी येण्याचे प्रमाणही मोठे होते. आफ्रिका, युरोपमधील अनेक पक्षी हिवाळ्यात येथे दाखल दाखल होतात. मात्र स्थलांतरीत पक्षी येण्याचे प्रमाण कमी होत असल्याचा अंदाज पक्षीमित्रांकडून व्यक्त होतो. नोव्हेंबर महिन्यात थंडीची चाहूल लागताच या महिन्यामध्ये स्थलांतरीत पक्षी येण्याचा मौसम सुरू होतो. मात्र इथल्या बदलत्या हवामानामुळे हे पक्षी मुंबईत उशिराने दाखल होतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत असला तरी आता गुलाबी थंडीत झाडांवर दिसणारे अनेक स्थलांतरीत पक्षी दिसेनासे झाले आहेत. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, आरे कॉलनी, विक्रोळी पार्कसाइट, दादर हिंदू कॉलनी, आयआयटी पवई, मलबार हिल, रेसकोर्ससारख्या ‘ग्रीनपॅच’ भागात अनेक प्रकारचे स्थलांतरीत पक्षी दिसतात. परंतु दरवर्षीच्या प्रमाणात त्यांच्या संख्येत घट झाली असल्याचा अंदाज पक्षीतज्ज्ञ आदेश शिवकर यांनी व्यक्त केला आहे.
पावसाळा आला की, मुंबापुरीत झाडे लावण्याचा सपाटा सरकारी आणि सामाजिक संस्थांकडून सुरू होतो. परंतु लावलेली झाडं इथल्या पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी फायदेशीर आहेत का, याचा कोणी विचार करत नाही. मुंबईत झटपट श्रीमंत होण्यासाठी येणाऱ्यांचा लोंढा जसा वाढला आहे, तशी झटपट वाढणाऱ्या गुलमोहरसारख्या झाडांची संख्या वाढली आहे. परंतु अशा झाडांमुळे पर्यावरणाचा समतोल राखला जाईल, याची शाश्वती नाही. खरं तर इथल्या वातावरणानुसार येथे वड, पिंपळ, उंबर, आंबा अशी झाडं लावली पाहिजेत. या झाडांची वाढ थोडी उशिराने होत असली तरी ती झाडं पक्ष्यांच्या संवर्धनासाठी महत्त्वाची असतात. हिवाळ्यात आपल्याकडे दोन प्रकारचे पक्षी येतात. एक म्हणजे समुद्रकिनारी आणि दुसरे ‘ग्रीनपॅच’ परिसरात वावरणारे. या ग्रीनपॅचमध्ये मध्य भारताबरोबर आशिया, आफ्रिका आणि युरोपातून पक्षी येतात. सर्वसाधारण पूर्वी मुंबईत सुमारे 350 प्रकारचे पक्षी हिवाळ्यात आढळत होते. त्यापैकी 35 ते 40 टक्के स्थलांतरीत पक्षी होते. आता ग्रीनपॅचमध्ये पक्ष्यांच्या केवळ 30 ते 40 जातीच दिसतात. बोर्डीमैना (अफगाणिस्तान), वॉरब्लेर्स (सैबेरिया), हळद्या (मध्य भारत) असे काही पक्षी दिसत होते, परंतु त्यांचं दिसणं आता दुर्मीळ झालं आहे. भारतात परदेशातून शिकारीसाठीही काही पक्षी येतात. त्यामध्ये बहिरी ससाणा, स्टेफी इगल, ग्रेटर स्पोटेल इगल, पॅरोहॉक, फाल्कनसारखे युरोप आणि सैबेरियातील पक्षी दाखल होत असत. एकूण, मुंबईतील पर्यावरण पूर्वी खूप चांगलं होतं, मात्र वाढत्या शहरीकरणाच्या नादात इथला निसर्ग हरवत चालला आहे. इथल्या पर्यावरणाचं ख-या अर्थाने संवर्धन करायचं असेल तर इथले शिल्लक असलेले ग्रीनपॅच सुरक्षित ठेवले पाहिजेत. शिवाय नवीन ग्रीनपॅच तयार करण्यासाठी स्थानिक झाडांनाच प्राधान्य दिलं पाहिजे, असे पक्षीतज्ज्ञांचे मत आहे.
वाढती जंगलतोड, मोबाईल मनोरे, वणवे यांनी पक्ष्यांचा निवारा गिळकृत करून टाकला आहे. आज झाडांची संख्या मोठय़ा प्रमाणावर कमी होते आहे, बठी घरं जाऊन उंचच उंच इमारती उभ्या राहात आहेत,वाढते शहरीकरण , वृक्षतोड , प्रदूषण या जुन्या समस्यांसोबत मोबाइल ट
ReplyDeleteॉवर्सच्या लहरींमुळे होणारा त्रास ... या आणि अशा अनेक कारणांमुळे मुंबईतील पक्षीविश्व पूर्णपणे विस्कटून गेले आहे . केवळ चिमण्याच नव्हे तर परिसरातील अनेक पक्षी दुर्मीळ होत चालले असून या पाखरांना घराकडे परत आणण्यासाठी गोरेगाव येथील संस्थेने कृत्रिम घरटी बनवण्याची अनोखी स्पर्धा आयोजित केली आहे . 'नैसगिर्क अधिवास नष्ट होत असल्याने अनेक पक्षी शहरापासून दूर जात आहेत, हे वास्तव असले तरी आपण नैसगिर्क पद्धतीची घरटी तयार करून त्यांना नक्कीच परत आणू शकतो. दिवसेंदिवस वाढत असलेल्या वृक्षतोडीमुळे पक्ष्यांना घरट्यांसाठी आवश्यक असलेली ढोली, दाट झाडी पहायला मिळत नाही. वळचणीच्या जागा कमी झाल्या आहेत, स्थानिक झाडं, ज्यांच्यावर पक्ष्यांना घरटी करायची असतात, त्यांची संख्या कमी होते आहे.. या आणि अशा अनेक कारणांमुळे पक्ष्यांच्या अधिवासांवर संक्रांत आलेली आहे. अन्न आणि निवारा याच पक्ष्यांच्या दोन मुख्य गरजा आणि त्यातील निवाऱ्याचाच प्रश्न भेडसावू लागल्याने पक्ष्यांच्या संख्येवर त्याचा परिणाम होऊ लागला आहे. अशा सैरभैर झालेल्या पक्ष्यांसाठी साद प्रतिसादने कृत्रिम घरटी स्पर्धा आखली आहे. नागरिकांनी या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन साद प्रतिसादचे सचिव संदीप सावंत 9870841841 यांनी केले आहे. मुंबईची बजबजपुरी झाली असली तरी शहर आणि आजूबाजूच्या परिसरात विविध पक्षी सुखनैव संचार करताना पाहायला मिळत होते . मात्र , गेल्या काही काळापासून पक्ष्यांचे वैविध्य लयाला गेल्याने पक्षप्रेमींमध्ये चिंता निर्माण झाली आहे . पाखरांचा हा संचार कायम रहावा यासाठी गोरेगावच्या ' साद प्रतिसाद ' संस्थेने पक्ष्यांसाठी कृत्रिम घरटी स्पर्धा आयोजित केली आहे . या स्पर्धेतून मुंबईकरांमध्ये पक्ष्यांविषयी आवड आणि जागृती करण्याचा हा प्रयत्न असल्याचे संयोजक सांगतात . ही स्पर्धा संपूर्ण मुंबई परिसरासाठी आयोजित करण्यात आली आहे .१५ वर्षापूर्वी अशी स्पर्धा जागतिक पातलिवर यूरोप मध्ये झाली होती. भारतात प्रथमच मुंबई करिता अशी स्पर्धा होत आहे . त्याच धर्तीवर विविध पक्ष्यांचा आकार , जीवनशैली , अंड्यांचा आकार लक्षात घेऊन कृत्रिम घरटी बनवण्याचे आव्हान या स्पर्धेत असेल , असे संस्थेचे सचिव संदीप सावंत यांनी सांगितले . स्पर्धेत भाग घेण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर आहे .आपल्या प्रतिक्रिया Saadpratisad@gmail.com व साद प्रतिसाद फेसबूक व स्पर्धक नोंदणी करू शकतात. स्पर्धकांना बनवलेल्या सर्व घरट्यांचे गोरेगावमध्ये मोठे प्रदर्शन भरवले जाणार असून विजेत्यांना रोख बक्षीस , चषकाने सन्मानित केले जाणार आहे . त्याशिवाय , मागणीनुसार ' ना नफा , ना तोटा ' तत्त्वावर या घरट्यांची निर्मिती केली जाईल . त्यासाठी आदिवासी , महिला बचत गटाची मदत घेतली जाणार आहे . त्यानंतर राज्यस्तरावरही स्पर्धा आणि प्रदर्शन भरवून जागृती केली जाणार असल्याचे संस्थेने स्पष्ट केले आहे . इच्छुकांनी संदीप सावंत - ७७३८४१६८४१ , प्रा . निवृत्ती कुंभार - ९८२१३७०४४२ , काशिनाथ मोरे ९८६९१००८२६, शरद मराठे 9823627576 , सुशांत राणे - ९९२०३५४४८५ यांच्याशी संपर्क साधावा.