Thursday, December 2, 2010

.जेव्हा चाकरमानी जीवावर उदार होतो

प्रशांत सिनकर
फॉन्ट साईज Decrease font Enlarge font
Prahaa Online

चालती रेल्वेगाडी पकडू नका,’ असा संदेश वारंवार देऊनही प्रवासी जीवावर उदार होऊन धावती गाडी पकडण्याचा किंवा गाडी थांबण्यापूर्वीच त्यातून उतरण्याचा धोका पत्करताना दिसतात. मुंबईतल्या गर्दीच्या रेटय़ामुळे त्यांना दुसरा पर्यायही नसतो. मात्र आता केवळ उपनगरीच नव्हे, तर लांब पल्ल्याच्या गाडय़ा पकडण्यासाठी प्रवासी आपला जीव धोक्यात घालू लागले आहेत. कोकणात जाणा-या गाडय़ांमध्ये अनारक्षित डब्यांमध्ये शिरण्यासाठी झुंबड उडत असल्यामुळे रेल्वे रुळापलीकडे उभं राहून विरुद्ध बाजूने गाडीत शिरण्याची कसरत प्रवासी करताना दिसत आहेत.

गणपती आणि होळीचा सण कोकणात जाऊन साजरा करण्याची तीव्र इच्छा मुंबईतल्या चाकरमान्यांना असते. वेळात वेळ काढून हा सण साजरा करण्यासाठी कोकणामध्ये मिळेल त्या वाहनाने जाण्याचा चाकरमानी कसोशीने प्रयत्न करतात. या काळात होणारी गर्दी लक्षात घेऊन एसटी महामंडळ आणि रेल्वेतर्फे खास गाडय़ाही सोडल्या जातात. मात्र गर्दीच इतकी असते की, अनेकांना आरक्षण मिळत नाही. त्यामुळे जागा मिळवण्यासाठी अनेकदा जीव धोक्यात घालून गाडी पकडावी लागते. तसाच प्रकार आता होताना दिसतोय.

चाकरमान्यांना होळीचे वेध लागायला लागले असून त्यांचा कोकणच्या दिशेने प्रवास सुरू झाला आहे. त्यांच्यासाठी नेहमीप्रमाणे एसटी महामंडळ आणि रेल्वे प्रशासनाने खास गाडय़ाही सोडल्या आहेत. मात्र या गाडय़ाही अपु-याच असल्यामुळे जागा पटकावण्यासाठी आपला जीव धोक्यात घालण्यावाचून प्रवाशांना पर्याय नाही. दादर रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक ७ वरून दुपारी ३.३० वाजता सुटणारी दादर-रत्नागिरी पॅसेंजर ही गाडी पकडताना तर प्रवासी मोठाच धोका पत्करताना दिसत आहेत. ही गाडी नेहमीच हाऊसफुलहोऊन जाते. चाकरमान्यांच्या खिशाला परवडणारी ही गाडी असल्यामुळे कोकणात जाणारा सर्वसामान्य माणूस या पॅसेंजर गाडीला प्रथम पसंती देतो. रेल्वे स्थानकात ज्या वेळी ही पॅसेंजर येत असते, त्या वेळी फलाटावरील प्रवासी तर धावती गाडी पकडण्याचा प्रयत्न करतातच. तर त्यांच्यावरही कडी करत काही प्रवासी फलाटाच्या विरुद्ध दिशेला रुळांच्या बाजूला उभे राहून ही धावती गाडी पकडण्याचा प्रयत्न करतात. ज्या वेळी ही गाडी येत असते, त्या वेळी कसलाही पुढचा-मागचा विचार न करता हे प्रवासी फलाटावरून खाली उडय़ा मारतात आणि गाडीमध्ये बसण्यासाठी स्वत:ला जागा करून घेतात. परंतु हे सर्व करत असताना कदाचित रेल्वेच्या चाकाखाली जाऊन जीवही जाऊ शकतो, हे माहीत असूनदेखील अशा प्रवाशांना म्हणावं तरी काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

prashant.sinkar@prahaar.co.in

वाळी अधिवेशनाच्यावेळी

prashant प्रशांत